सुरुची

Posts Tagged ‘चकलीची भाजणी

साहीत्य:

 • ५०० ग्राम मोठ्ठे तांदुळ
 • २५० ग्राम हरभरा डाळ
 • १२५ ग्राम उडीद डाळ
 • ५० ग्राम पोहे
 • २० ग्राम (फुटाणे) डाळं
 • २ मोठ्ठे चमचे धणे
 • १ मोठ्ठे चमचा जीरा
 • १ टेबल चमचा तिखट
 • ३/४ टेबल चमचा मीठ
 • २ टेबल चमचा तिळ
 • ३ टेबल चमचा तेल (मोहनसाठी)
 • तेल तळण्यासाठी
 • दिड ग्लास पाणी

कृति:

प्रथम तांदूळ, पोहे, उडीद डाळ व हरभरा डाळ (वेगवेगळे) मंद आचेवर  लालसर भाजुन घेणे.   जिरे व धणे पण मंद आचेवर भाजणे. सर्व एकत्र करून बारीक दळल्यावर चकलीची भाजणी तयार !

चकली करताना तयार झालेल्या भाजाणी पैकी ३ ग्लास भाजाणी पीठ वेगळे करावे. गार पाण्यामधे तिखट, मीठ, तीळ व तेल घालून ते उकळ्यावर गॅस बंद करावा. मग त्यात ते पीठ घालावे. हे थोडावेळ हलवून झाकून ठेवावे. तयार झालेल्या ह्या ओलसर मिश्रणाला गरजेनुसार पाणी लावून मळून कणीक तयार करवी.

त्या कणकेच्या चकली मशीनमधून चकल्या पाडून त्या गरम तेलात तळाव्या.

खुसखुशीत चकल्या तयार !

खुसखुशीत चकल्या


Follow

Get every new post delivered to your Inbox.